जळगाव : प्रतिनिधी
शहरातील आशाबाबा नगर परिसरातील २६ वर्षीय तरुणीचा आयएमआर कॉलेजजवळील अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या असतांना तिच्या तीन दिवस खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर तीन दिवसानंतर या तरुणीची शनिवारी प्राणज्योत मालवल्याने तीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. याप्रकरणी शनिवारी 25 फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील आशाबाबा नगरात पूनम सुनिल विसपुते ही तरूणी आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. तळवलकर जीम येथे सेल्स मॅनेजर म्हणून नोकरीला होती. दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास जीमला येत असतांना आयएमआर जवळील महामार्गावर अज्ञात वाहनाने पूजन विसपुते यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पूनम ही गंभीर जखमी झाली होती. तिला शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पूनम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु तिची प्रकृती अधिक खालावल्याने शनिवारी उपचारादरम्यान तीची प्राणज्योत मालवली. मुलीचा मृत्यू झाल्याने विसपूते परिवाराने एकच आक्रोश केला होता. मयत पुनमच्या पश्चात वडील, भाऊ आणि मोठी बहिण असा परिवार आहे. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ तुषार जावरे करीत आहे.