Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलीसहि चक्रावले ; लसणाच्या पिकात अफूची शेती !
    क्राईम

    पोलीसहि चक्रावले ; लसणाच्या पिकात अफूची शेती !

    editor deskBy editor deskFebruary 26, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    औरंगाबाद : वृत्तसंस्था

    औरंगाबाद ग्रामीणच्या पाचोड पोलिसांनी मोठी कारवाई करत चक्क अफूची शेती करणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहे. पैठण तालुक्यातील गाव तांडा खुर्द शिवारात एका शेतात पोलिसांनी छापा टाकून अफूची 250 झाडे जप्त असून, यात दोन लाख 14 हजार 774 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यात एका शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रामभाऊ गोर्ड असे आरोपीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील गाव तांडा खुर्द येथील शेतकरी रामभाऊ गोर्ड यांनी त्यांच्या शेतात अफूच्या झाडांची लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने कारवाईसाठी पोलीस पथक तयार केले. दरम्यान, गुरुवारी (23 फेब्रुवारी) दुपारी पथकाने गावतांडा खुर्द शिवारातील शेतीवर छापा टाकला. यावेळी संशयित रामभाऊ गोर्ड यांच्या शेत (गट नंबर 27) शेताच्या मधोमध गहू आणि लसूण पिकाच्या आडोशाला अफूच्या झाडांची लागवड केल्याचे दिसले. यावेळी बअर्धा गुंठा जागेत अफूचे पीक घेतल्याचे पथकाच्या पाहणीत समोर आले. त्यामुळे कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनी पंचनामा करत गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी यावेळी केलेल्या पाहणीत शेतातून पूर्ण वाढ झालेली दोन ते अडीच फूट उंचीची अफूची 250 झाडे आढळून आली. ज्याची अंदाजे किंमत दोन लाख 14 हजार 774 रुपये आहेत. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. तर पुढील तपास पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल पा. नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माने यांच्यासह कर्मचारी करीत आहे. माहितीनुसार, या अफूच्या झाडांची उंची दोन-अडीच फूट असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे हे पीक लावून किमान चार ते पाच महिने झाल्याचा अंदाज आहे. तर झाडांची वाढ पूर्णपणे झाली असून, पीक काढणी आधीच पोलिसांनी छापा मारला. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून, गुन्हाही दाखल केला आहे. तर आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.