Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकी आदळल्याने वृद्ध शेतकरी ठार !
    क्राईम

    दुचाकी आदळल्याने वृद्ध शेतकरी ठार !

    editor deskBy editor deskFebruary 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने रस्त्यामध्ये ठेवलेल्या सिमेंटच्या ब्लॉकवर दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वार शेतकरी विजय मुरलीधर पाटील (वय-65, रा. नशिराबाद) हे जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी 7 वाजता जळगाव खुर्द उड्डाणपुलावर घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे विजय पाटील हे वास्तव्यास असून शेती करतात. शनिवारी सकाळी रावेर तालुक्यातील पिंपळगांव येथे खासगी कामासाठी जाण्यासाठी (एमएच 19-बीबी-6933) क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते. जळगाव खुर्द गावाजवळील रेल्वेवरील उड्डाण पुलाचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे. वाहनचालकांना पुढे अपघाती जागा असल्याची कल्पना यावी म्हणून पुलावर सिमेंटचे मोठे ब्लॉक ठेवण्यात आले आहे. सकाळी 7 वाजेच्या सुमारास उड्डाणपूलावरून जात असताना विजय पाटील यांची दुचाकी सिमेंटच्या ब्लॉकवर जावून धडकली.

    यात पाटील यांच्या डोक्याला दुखापत होवून रक्तस्त्राव झाल्यामुळेत्यांचा दुचाकीवर बसलेल्या अवस्थेतच मृत्यू झाला. पोलिसांनी विजय पाटील यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास देण्यात आला. पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली,जावई असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.