जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून तापमानात कमालीची वाढ झालेली आहे. फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांसह जिल्ह्यातील शाळा १ मार्चपासून सकाळसत्रात भरविण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाकडून हालचाली सुरु केली आहे.
दहा दिवसा पासून तापमानाचा पारा वाढत आहे. दिवसा उन्हाचे चटके बसत आहे. तर रात्री व सकाळी थंडीचा गारठा जाणवत आहे. मात्र, तापमानात चढ-उतार सुरु असला तरी आज तापमानाच्या पार्याने ३६ ते ३७ अंशाचा टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. एका आठवड्याभरानंतर ४० अंशापर्यंत पारा वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्ह्याभरातील जि.प.शाळांसह खासगी शाळा देखील दि.१ मार्चपासून सकाळी ७ ते ११.३०वोजपर्यंत सुरु करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आलेली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाकडून १मार्चपासून शाळा भरविण्यासंदर्भात प्रस्ताव करण्यात येत असून जि.प.सीईओंकडे हा प्रस्ताव रवाना करण्यात येईल.जि.प.सीईओंच्या स्वाक्षरीनंतर १मार्चपासून सकाळसत्रात शाळा भरविण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील दिली.