बिलखेडे ग्रामस्थांच्या प्रेमाने भारावले पालकमंत्री
मराठा समाजाचा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही हा उठाव केला
बिलखेडे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करतांना राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव आणि बुलढाणा जिल्हा ना.श्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते बिलखेडे येथे जलजीवन योजना अंतर्गत भूमिपूजन संपन्न झाले.
ना.पाटील – आपल्या गावची सून आपल्या गावाच्या समस्या मांडू शकते, ते गाव विकासाच्या दिशेने जात आहे हे लक्षात येते. गावाच्या अंतर्गत वाद मी पाहत नाही, मी फक्त गावाचा विकास कसा होईल हेच उद्धिष्ट डोक्यात ठेवतो.
मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना साथ दिली आणि मुख्यमंत्री केले मग आम्ही काय चुकलो की आम्ही मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
या वेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव ननव्हरे,महिला आघाडी चे जिल्हा प्रमुख सरिताताई माळी, तालुका प्रमुख गजानन नाना पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर, युवासेना ता. प्रमुख दीपक भदाणे, उपजिल्हा प्रमुख भैय्या माळी, प्रवीण मराठे सर, पिंटू कोळी, चेतन पाटील, शरद पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, प्रमोद बापू पाटील, डॉ भदाणे, भाऊसाहेब पाटील,नगरसेवक विलास महाजन, भानुदास विसावे, विनायक माळी, बुटा भाऊ माळी, समाधान पाटील भोनेप,स, सदस्य प्रेमराज पाटील, डी ओ पाटील,मोती आप्पा पाटील, महिला आघाडीच्या प्रिया इंगळे ,उगलाल पाटील, धिरेंद्र पुरभे, पवन पाटील, अजय पाटील, दीपक जाधव, बिलखेडे सरपंच दीपाली चंद्रकांत पाटील, जिजाबाई भदाणे, उपसरपंच सुनीता ताई भदाणे, पप्पू भावे, नितीन पाटील, संभाजी कंखरे, निंबा कंखरे, भगवान महाजन, शुभम चव्हाण यावेळी सूत्रसंचालन बापू सर यांनी केले
सरपंच दीपाली ताई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले
आज आमच्या गावात आनंदाचा क्षण आला आहे ना,पाटील यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन संपन्न झाले आम्ही धन्य झालो, सरपंच असतांना पालकमंत्री साहेबांनी पाणीपुरवठा योजना, व्यायाम शाळा, स्मशान भूमी दिली म्हणून गावाच्या वतीने भाऊंचे आभार व्यक्त करते
विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर – राजकारणाच्या आखाड्यात विरोधकांना कसे पाणी पाजायचे ना.पाटील यांना चांगले माहीत आहे, माझी आई बहीण हंडा घेऊन पाणी घ्यायला वन वन फिरावे नाही लागणार अशी ग्वाही देतो.
मुकुंदराव यांनी मार्गदर्शन केले की पालकमंत्री ना.पाटील यांनी कॅबिनेट मध्ये आदिवासी भिल्ल समजा साठी ठक्कर बाप्पा योजना सुरू केली व जेवढा निधी दलित समाजाला मिळतो तेव्हढाच निधी आता भिल्ल समाजाला मिळणार आहे
यावेळी गारखेडे येथील शरद महाजन व जळगाव जिल्हा वारकरी संप्रदायाचे जेष्ठ कीर्तनकार पांडुरंग हरिदास महाजन यांनी प्रवेश केला