जळगाव : प्रतिनिधी
चोपडा तालुक्यात यावर्षी हरभरा व मकाचे क्षेत्रात वाढ झाल्याने आता हरभरा काढणी सुरू आहे. तापमानाचा पारा देखील वाढू लागल्याने शेतकरी हरभरा काढण्यात मग्न आहे.
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा विक्रीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर हरभरा घेऊन येतो आहे. मात्र शेतकऱ्याच्या या चाफा हरभरा मालाला 4400 ते 4600 पर्यंत भाव मिळत आहे. तर विठू हरभऱ्याला सहा हजार सहाशे रुपये भाव मिळत आहे. हरभरा मेक्सिको अकरा हजार पर्यंत भाव गेलेले असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी सांगितलं सध्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढले असल्याने रोजचे 80 ते 90 ट्रॅक्टर हरभराचे येत आहे.
या हरभऱ्याचे लिलाव देखील दोन टप्प्यात केले जात आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून दोन टप्प्यात लिलाव केला जात असल्याचेही चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे यांनी सांगितले. सरकारने हरभरा खरेदी केंद्र सुरू केलेल्या नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभरा विक्री करण्यासाठी आणावे लागत आहे. शासनाकडून चाफा हरभऱ्याला 46 च्या वर भाव जाहीर केलेला आहे. परंतु खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकरी शेतातून काढलेला माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत आहे. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला भावापेक्षा कमी भावाने विक्री करावी लागत असल्याने सरकार फक्त शेतकऱ्यांचा मालाला भाव जाहीर करतो परंतु खरेदी केंद्र सुरू करायला विलंब करीत असल्याने यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे.