लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुंबई-पुणे सारख्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे महिला पुरुष हे आपलं आत्मविश्वास दाखवू शकतात मात्र रुलर भागातील शहरांमध्ये सुंदरता आत्मविश्वास हुशारी या सर्व गोष्टी असल्यावरही ते दाखवण्यात ते सक्षम नसतात त्यामुळेच हे व्यासपीठ आपण निर्माण केले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण काही चेहरे सिलेक्ट करणार असून त्यांना चित्रपट वेबसाईट मिस्टर इंडिया मिसेस इंडिया असे व्यासपीठावर पाठवणार असल्याचे गौरा मिसेस मिस्टर खानदेश चे आयोजन करणाऱ्या गौरी नाईक यांनी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज शी चर्चा करताना सांगितले.
खानदेश मॉल येथे आज गौरा मिसेस मिस्टर खान्देश या बॅनरखाली एक फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी मिसेस इंडिया रनअप राहिलेल्या गौरी नाईक यांनी महाराष्ट्र लाईव्ह चे प्रतिनिधी यांच्याशी वार्तालाप करताना सांगितले की आपण जळगाव ठिकाणी एक व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी हा प्रयत्न करीत आहोत महिला व पुरुषांमध्ये खूप टॅलेंट आहे मात्र तो दाखवता येत नाही त्यासाठी हे व्यासपीठ निर्माण करण्यात येत आहे.
मुंबई दिल्ली बंगलोर या ठिकाणी जाऊन आपला टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा किंवा या ठिकाणी न जाता स्थानिक पातळीवर त्यांना व्यासपीठ मिळावे त्यासाठी हा सर्व प्रयत्न आहे लवकरच जळगाव मध्ये इन्स्टिट्यूट काढण्याचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखविली. आत्मविश्वास मिळावा स्वतःकडील असलेले कलाकौशल्य दाखवण्यासाठी संधी मिळावी हे सर्व काही मांडले क्षेत्राशी निगडित आहे असे नाही हे सर्व क्षेत्रांशी संबंधित आहे विद्यार्थी महिला पुरुष याना मान सन्मान मिळवून देण्यासाठी हे व्यासपीठ आहे.
स्वतःला होईल तितके सुदृढ बनवायचे आहे हा कोरोना पळून गेला पाहिजे जळगावात ही स्पर्धा आयोजित करण्याची दुसरी वेळ आहे.मी जरी पुण्याची असली तरी मी जलगावची असल्याचे वाटते.या स्पर्धात अनेक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला या स्पर्धांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करणे आहे. या स्पर्धेत काही चेहरे सिलेक्ट करणार असून त्यांना चित्रपट वेब सिरीज व दुसऱ्या स्पर्धांमध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे गौरी नाईक यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.