रावेर : प्रतिनिधी
प्रवाशांनी हात दाखवूनही बस न थांबविता त्यांच्याशी हुज्जत घालणार्या रावेर एस.टी.चालकाला निलंबित करण्यात आल्याने कर्मचार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. टी.आर.शेख असे निलंबन करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
भुसावळ येथून रावेरकडे येणार्या बसला हात दाखवून ही चालकाने गाडी थांबवली नव्हती. सावदा येथे येत या महिीला प्रवाशांनी चालक टी. आर. शेख यांना याबाबत जाब विचारला असता त्याने या महिला प्रवाशांशी हुज्जत घालत उर्मट व असभ्य भाषा वापरल्याने चालकाची तक्रार जळगाव येथील विभागीय नियंत्रक यांच्याकडे करण्यात आली. याची तात्काळ दखल घेत रावेर डेपोचे चालक टी. आर. शेख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
सोमवारी रावेर डेपोची बस (क्रमांक 2398) भुसावळ येथून रावेरकडे येत असताना भुसावळातील गांधी पुतळ्याच्या जवळ काही महिला प्रवाशांनी बसला हात दाखवून थांबविण्याची विनंती केली मात्र चालक शेख मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असल्याने त्यांनी बस थांबवली नाही. मागून आलेल्या जळगाव-तांदलवाडी बसने या महिला सावदा येथे आल्या. त्यावेळी उभ्या असलेल्या बस चालक शेख यांना बस का थांबवली नाही अशी विचारणा केली असता शेख यांनी महिलांवर ओरडून त्यांचा अपमान केला. या प्रकरणी तक्रार केल्यानंतर विभागीय नियंत्रक यांनी तत्काळ दखल घेऊन संबधीत चालक टी.आर.शेख यांना निलंबित केल्याने कर्मचारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.