Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिक्षिकेचा विध्यार्थीवर जडला जीव अन उचलले असे पाऊल !
    क्राईम

    शिक्षिकेचा विध्यार्थीवर जडला जीव अन उचलले असे पाऊल !

    editor deskBy editor deskFebruary 24, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    उत्तरप्रदेशातील झांसीमध्ये एका शिक्षिकेला प्रेमात धोका मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र आत्महत्येपूर्वी तिने सोशल मीडियावर पोलिसांना साद घालत प्रियकर यासाठी जबाबदार असल्याचे सांगून त्यानंतर ती बेपत्ता झाली. सोशल मीडियावर तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत असून पोलीस तरुणीचा शोध घेत आहेत.

    झांसी जिल्ह्यातील रक्सा परिसरातील सिजवाहा कालवा येथील ही घटना आहे. हा व्हिडीओ चार दिवस आधीचा असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी त्या व्हिडीओचा तपास केला असता शिक्षिकेची स्कूटी मिळाल्यानंतर पोलिसांनी कालव्यापासून बांधापर्यंत बेपत्ता शिक्षिकेचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप तिचा शोध लागलेला नाही. तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, कुंवर यादव नावाच्या व्यक्तीच्या घरी त्यांची मुलगी शिकवायचा जात असे. त्यादरम्यान दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. कुंवरने तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे आपल्या घरच्यांना सांगितले. मात्र कुंवरच्या घरच्यांनी त्यासाठी साफ नकार दिला. त्याच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्ाने ती फार निराश झाली आणि तिने प्रियकराला सिजवाहा कालव्याजवळ भेाटायला बोलावले. मात्र कुंवर तिथे न आल्याने तिने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पोलिसांकडे मदतीसाठी हाक मारली आहे. तिचा प्रियकरच तिच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचे ती बोलली जात आहे. तिच्या प्रियकराला शिक्षा मिळावी.

    तर प्रत्यत्क्षदर्शी लोकांच्या म्हणण्यानुसार, एक तरुणी कालव्याजवळ बराच वेळ बसलेली दिसली होती. अचानक तरुणीने कालव्यात उडी घेतली. याप्रकरणी एसपी ज्ञानेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसरा, आत्महत्या करत असल्याचे सांगत व्हिडीओ व्हायरल झालेल्या तरुणीचा शोध सुरु आहे. पोलिसांचे पथक सिजवाहा कालव्यात तरुणीचा शोध घेत आहेत. तरुणीच्या कुटुंबियांनी याबाबत कोणतीही तक्रार केलेली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.