जळगाव : प्रतीनिधी
एका परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत तिला गर्भवती केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह आठ महिन्यापूर्वी एका मुलासोबत झालेला होता. यावेळी मुलगी हि अल्पवयीन असल्याचे तिच्या सासरच्या मंडळीना माहित असून देखील त्यांनी विवाह करून घेतला, या विवाहासाठी मुलीच्या आईचा नकार असल्याने विवाह झाल्यानंतर याचा राग मनात ठेवून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेस मारहाण शिवीगाळ व मानसिक त्रास देत फिर्यादीच्या पतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या घरी तिच्यासोबत अत्याचार करीत गर्भवती ठेवल्या प्रकरणी फिर्यादीने दि २३ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिसात धाव घेत पतीसह सासरच्या चार जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोउनी.अनिस शेख हे करीत आहेत.