लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: अजिंठा चौकाजवळील एक भागात भाड्याच्या खोलीत सुरू असलेल्या कुटंनखान्यावर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने आज छापा मारला. या ठिकाणाहुन एक महिला व दोन दलालांना ताब्यात घेण्यात आले. तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली.
याबाबत महिती अशी की, अजिंठा चौफुलीजवळील एकाच्या घरात महिला भाड्याने राहत होती. महिलेने या घरात कुटंनखाना सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गफार तडवी, सुनिल सोनार, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, नीलेश पाटील, महेश महाले, रवींद्र मोतीराया यांच्या पथकाने एक बनावट ग्राहकाच्या माध्यमातून कुंटनखान्यात प्रवेश केला. यावेळी तेथे तीन पिडीत महिला मिळुन आल्या. त्यांची सुटका करण्यात आली. तरअमोन आदिनाथ दारकुंडे (वय २९, रा. क्रांतीचौक, शिवाजीनगर) व प्रशांत रतन जैन (वय ३१, रा. अयोध्यानगर, अजिंठा हौसिंग सोसायटी) यांच्यासह एका महिलेस ताब्यात घेऊन कारवाई केली. सपना एरगुंटला यांच्या फिर्यादीवरुन तीघांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.