Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात पोलिसांनी घेतले ‘पुष्पा’ला ताब्यात
    क्राईम

    जिल्ह्यात पोलिसांनी घेतले ‘पुष्पा’ला ताब्यात

    editor deskBy editor deskFebruary 23, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    गेल्या वर्षी ‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अनेक भागात मोठ्या प्रमाणात ‘पुष्पा’ च्या स्टाईलने गुन्हेगारी जगत वाढत चालले असतांना पोलिसांनी याचा बंदोबस्त केला आहे. चाळीसगाव तालुक्यातील बोढरे गावलगत जंगल परिसरात वनपाल, वनरक्षक यांना गस्थी दरम्यान चंदनाचे लाकूड तोडून, तस्कारी करणारे दोन चोरटे तस्कर आढळुन आले आहे. त्यांच्या ताब्यातून ५.१५० कि.ग्रॅम. लाकडासह लाकूड तोडीचे साहित्य मिळुन आले आहे. याप्रकरणी गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

    माहिती अशी, दि.२१ फेब्रुवारी रोजी चाळीसगाव वन्यजीव वनपरीक्षेत्रातील वनपाल, बोढरा व वनरक्षक, बोढरा जंगल गस्ती करत असताना, बोढरा गावामधील कक्ष क्रमां क.३१३ मध्ये दोन संशयात्मक इसम आढळून आले. वनपाल, बोढरा व वनरक्षक, बोढरा यांनी संबंधित इसमाला अटकाव करुन चौकशी केली असता, त्याच्याकडील एका नायलॉन पिशवीत ताज्या तुटीचे चंदन गाभा लाकूड ५.१५० कि.ग्रॅम. एक विना दांडा लोखंडी कुर्‍हाड, एक लाहन लोखंडी करवत तसेच दोन आयटेल कंपनीचे साधे मोबाईल मिळून आले.

    याबाबत वनकर्मचार्‍यांनी अधिकची चौकशी केली असता, बोढरा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३१३ मध्ये सदर इसमांनी चंदनाची झाडे तोडून त्यापासून सुगंधित चंदन लाकूड गाभा करवत व कुर्‍हाडच्या सहाय्याने तयार करुन एका नायलॉनच्या पिशवीमध्ये जमा केल्याचे आढळून आला. सदरचा मुद्देमाल वनपाल, बोढरा यांनी जप्त करुन भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम २६(१) ड, इ, फ, ४१(२) ब तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ चे कलम २७, २९ भा.द.वि. कलम ३७८, ३७९ अन्वये वनरक्षक, बोढरा यांनी चाळीसगाव पोलिसात सलमान खॉं. अबरार खॉं. पठाण, वय ३२ व शाबीर खॉ. अजमेर खॉं. पठाण, वय २४ दोन्ही रा.कुंजखेडा, ता.कन्नड, जि. औरंगाबाद यांच्या विरुध्द वनरक्षक, बोढरा यांच्या कडील प्र.रि.०१/२०२३ दिनांक २१/०२/२०२३ अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला.
    दोघे आरोपींना चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता, आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई वनपाल डि.के.जाधव, वनरक्षक अजय महिरे, अमित पाटील, जुनोने, रहीम तडवी, प्रसाद कुलकर्णी, अशोक मोरे, विशेष वनरक्षक, उमेश सोनवणे, बापू अगोणे, लालचंद चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, संरक्षण मजूर यांनी केली आहे.सदरची कार्यवाही मोहन नाईकवाडी, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) औरंगाबाद आशा चव्हाण, सहा. वनसंरक्षक (वन्यजीव), कन्नड, ज्ञानेश्वर देसाई, वनपरीक्षेत्र अधिकारी (वन्यजीव), चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास डि.के.जाधव, वनपाल, बोढरा हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.