Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पतीचा विचार करून ठेव म्हणत विवाहितेचा जळगावात विनयभंग !
    क्राईम

    पतीचा विचार करून ठेव म्हणत विवाहितेचा जळगावात विनयभंग !

    editor deskBy editor deskFebruary 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    तू जर माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाही तर तुझा आणि तुझ्या पतीचा विचार करून ठेव, अशी धमकी देऊन पतीच्याच मित्राने २० वर्षीय महिलेला घरी बोलवून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून बुधवारी रामानंदनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. अधून-मधून पतीसोबत त्यांचा मित्र हा घरी येत होता.

    दीड महिन्यापासून पतीचा मित्र हा फोन करून विवाहितेशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्याने विवाहितेला फोन करून तुझ्याशी अर्जंट काम आहे, तू लवकर माझ्या घरी ये असे त्याने सांगितले. विश्वास ठेवून विवाहिता त्या मित्राच्या घरी गेल्यावर त्याने विवाहितेचा हात पकडून विनयभंग केला. नंतर तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेव, असे म्हणू लागला. विवाहितेने नकार दिल्यावर माझ्याची प्रेमसंबंध ठेवले नाही तर तू तुझा आणि तुझ्या पतीचा विचार करून ठेव, अशी धमकी दिली. व विनयभंग केला. विवाहितेने संपूर्ण प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर बुधवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.