Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : जिल्ह्यातील १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या !
    क्राईम

    मोठी बातमी : जिल्ह्यातील १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या !

    editor deskBy editor deskFebruary 23, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्हा पोलीस स्थानकाच्या रखडलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश मंगळवारी रात्री उशिरा पोलीस अधीक्षक एम.राज कुमार यांनी काढले आहेत. त्यामुळे आता १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याने प्रभारी राज संपला आहे.

    बदली आदेशानुसार रामानंद पोलीस निरीक्षकपदी शिल्पा पाटील, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी संदीप भटू पाटील, चोपडा ग्रामीणसाठी कावेरी कमलाकर, यावल पोलीस ठाणे राकेश माणगावकर, जिल्हा विधी शाखा रंगनाथ धारबळे, चाळीसगाव ग्रामीण बबन आव्हाड, धरणगाव पोलीस ठाणे उद्धव डमाळे, भडगाव पोलीस ठाणे राजेंद्र पाटील, एरंडोल पोलीस ठाणे सतीश गोराडे अमळनेर पोलीस ठाणे विजय शिंदे, एमआयडीसी पोलीस ठाणे जयपाल हिरे, जिल्हा पेठ पोलीस ठाणे ज्ञानेश्वर जाधव, सायबर पोलीस ठाणे अशोक उत्तेकर, नियंत्रण कक्ष संजय ठेंगे यांच्या नियमित व प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत तर शनिपेठ पोलीस ठाणे शंकर शेळके, पाचोरा पोलीस ठाणे राहुल खताळ व चोपडा शहर पोलीस ठाणे कांतीलाल पाटील यांची विनंतीवरून बदली करण्यात आली आहे.
    सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या असून त्यात मानव संसाधन विभागात सुनंदा पाटील, वाचक एसडीपीओ चाळीसगाव आशा जाधव, भुसावळ तालुका पोलीस ठाणे अमोल पवार, एमआयडीसी पोलीस ठाणे अमोल मोरे, जळगाव शहर पोलीस ठाणे किशोर पवार, भुसावळ शहर पोलीस ठाणे निलेश गायकवाड, यावल पोलीस ठाणे विनोद कुमार गोसावी, रावेर पोलीस ठाणे शितल कुमार नाईक, सावदा पोलीस ठाणे जालिंदर पळे, अडावद पोलीस ठाणे गणेश बुवा, एमआयडीसी पोलीस ठाणे रामेश्वर मोताळे यांची प्रशासकीय व मुदतवाढ म्हणून बदली झाली आहे. तसेच जिल्हापेठ पोलीस ठाणे किरण दांडगे, शहर वाहतूक शाखा संदीप हजारे, धरणगाव पोलीस ठाणे प्रमोद कठोरे तर मुक्ताईनगर पोलीस ठाणे संदीप दुनगहू यांची विनंतीवरून बदली करण्यात आली आहे जिल्ह्यातील १५ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहे. यामध्ये अमळनेर पोलीस ठाणे भैय्यासाहेब देशमुख, डायल 112 गणेश अहिरे, सावदा पोलीस ठाणे विनोद खांडबहाले, पाचोरा पोलीस ठाणे विजया बसावे, यावल पोलीस ठाणे अविनाश दहिफळे, मुक्ताईनगर पोलीस ठाणे संदीप चेडे, नियंत्रण कक्ष गोकुळ गवारे यांना प्रशासकीय व नियमित पदस्थापना देण्यात आली आहे तर स्थानिक गुन्हे शाखा गणेश चौभे, सावदा पोलीस ठाणे शांताराम पाटील, स्थानिक गुन्हे शाखा गणेश वाघमारे, वाचक परस्पर उपविभाग सुनील वाणी, शनिपेठ पोलीस ठाणे प्रदीप चांदलकर, जिल्हा जिविशा के.परविन तडवी, आर्थिक गुन्हे शाखा सुदाम काकडे, शनिपेठ पोलीस ठाणे अमोल देवडे यांची विनंती वरून बदली करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.