Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पुण्यात दिली मैदानी चाचणी ; पहूरात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
    क्राईम

    पुण्यात दिली मैदानी चाचणी ; पहूरात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    editor deskBy editor deskFebruary 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पहूर : प्रतिनिधी 

    कॉलेज वयातच पोलिस होऊन‎ वडिलांना ‎हातभार ‎लावण्याचे स्वप्न‎ उराशी‎ बाळगणाऱ्या ‎तरुणाचा ‎मंगळवारी दुर्दैवी‎ मृत्यू झाला. रोशन‎ भैरू पवार (वय २०, रा. पहूर) असे‎ मृताचे नाव आहे. त्याच्यावर जामनेर‎ येथील खासगी रुग्णालयात उपचार‎ सुरू होते. सोमवारी त्याने पुणे येथे‎ पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी‎ दिली होती.‎

    पहूर येथील भैरू बळीराम पवार‎ हे पत्नीसह मजुरी करतात. त्यांचा‎ मुलगा रोशन जामनेर येथील‎ धारीवाल महाविद्यालयात बी.ए.‎ द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता.‎ त्यासोबत तो पोलिस भरतीची तयारी‎ करत होता. पुणे येथे पोलिस भरती‎ सुरू असल्याने रविवारी रात्री रोशन‎ पुण्याला गेला होता. सोमवारी त्याने‎ मैदानी चाचणी दिली. रोशन‎ भैरू पवार (वय २०, रा. पहूर) असे‎ मयत तरुणाचे नाव आहे.
    यानंतर दुपारी‎ त्याला डी हायड्रेशनचा त्रास झाला.‎ स्थानिक पोलिसांनी त्याच्यावर‎ प्राथमिक उपचार करून भुसावळला‎ जाणाऱ्या रेल्वेत बसवून दिले. ही‎ माहिती रोशनने वडिलांना‎ फोनवरून दिली होती. यामुळे‎ मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास‎ रोशनचे मित्र व नातेवाईक‎ भुसावळला गेले होते. त्याला‎ भुसावळात खासगी रुग्णालयात‎ दाखल केले होते. प्रकृतीत सुधारणा‎ होत नसल्याने रोशनला जामनेर‎ येथील रुबी रुग्णालयात दाखल‎ केले; परंतु शरीरातील पाणी खूप‎ कमी झाल्याने अखेर मंगळवारी‎ दुपारी दोनच्या सुमारास त्याचा दुर्दैवी‎ मृत्यू झाला. बुधवारी सकाळी‎ त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात‎ येणार आहेत. रोशनच्या पश्चात‎ आई, वडील, दोन भाऊ, आजी,‎ आजोबा असा परिवार आहे.‎

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पुणे जमीन घोटाळा : पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही? दमानियांचा थेट सवाल

    December 22, 2025

    बांगलादेशात राजकीय हिंसाचार वाढला : नेत्यावर घरात घुसून गोळीबार

    December 22, 2025

    जळगाव : धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.