मुंबई : वृत्तसंस्था
व्हॅलेंटाईन डे निमित्त मुंबईसह संपूर्ण देशात प्रेमाच्या सणाचा उत्साह ओसंडून वाहत होता. तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील सांताक्रूझमध्ये 14 फेब्रुवारी रोजी एका हॉटेलच्या बाहेर पृथ्वीसोबत कथितपणे मारहाण झाली. पृथ्वीच्या कारवर बेसबॉल बॅटने तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरुणी आणि तिचे इतर मित्र यांच्याशी पृथ्वीचा वाद झाला. या दोघांना पृथ्वीसोबत सेल्फी हवा होता. मात्र पृथ्वीने यांना आपल्यासोबत सेल्फी घेण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद आणखी वाढला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. यानंतर हे सर्व प्रकरण घडलं. दरम्यान आता या प्रकरणात काय होतं, याकडे लक्ष असणार आहे.
सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर असलेली तरुणी आणि टीम इंडियाचा क्रिकेटर पृथ्वी शॉ यांच्यात सुरु असलेला वाद अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये. या दरम्यान आता तरुणीने पृथ्वीवर फार गंभीर आरोप केलेत. टीम इंडियाएकाबाजूला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा स्टार खेळाडू हा चांगलाच अडचणीत सापडला आहे.
या खेळाडूवर तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे हा क्रिकेटपटूची डोकेदुखी वाढली आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर या क्रिकेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता या तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील न्यायालयाने पृथ्वीसोबत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी आणि त्याच्या कारवर बेसबॉलच्या बॅटने तोडफोड केल्याने तरुणी आणि 3 जणांना 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होता. जामीनावार बाहेर आल्यानंतर तरुणीने हीने पृथ्वीवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणीने प्रतिक्रिया दिली. “आम्ही कुणाला मारलं नाही. तसेच पैशांची मागणीही केली नाही. आमच्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे आहेत”, अशी प्रतिक्रिया या तरुणीने दिली.
“आम्ही काही सेल्फीबाबत म्हणाले नाही. आम्ही आमच्या मस्तीत होतो. तेव्हा माझा मित्र व्हीडिओ काढायला लागला. तेव्हा मी पाहिलं की ती लोकं माझ्या मित्राला मारत होते. पुरावा दाखवता यावा यासाठी माझा मित्र व्हीडिओ काढ होता. मी माझ्या मित्राला बचावण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर ती लोकं मला बेसबॉलने मारायला लागले. मला 1-2 जणांनी मारलं. तसंच माझ्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला. इतकंच नाही, तर मला कानाखाली मारली”, असे गंभीर आरोप या तरुणीने केले. या प्रकरणात तरुणीच्या तक्रारीनंतर पृथ्वी आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल झाला. पृथ्वीशिवाय आशिष यादव, ब्रिजेश आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना गिल हीने आयपीसीच्या कलम 34, 120 बी, 144, 146, 148, 149, 323, 324, 351, 354 आणि 509 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.