प्रतिनिधी प्रवीण पाटील: तालुक्यातील जळके येथील बंधारा आहे त्या बंधाऱ्याला गेल्या दोन ते तीन झालेल्या अतिवृष्टी मुळे सिमेंट बांधच्या दोन्ही बाजु या कोरल्या गेल्या आहेत त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने भविष्यात पाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाणी थांबविण्यासाठी मागणी होत आहे.
जळके तालुक्यात जळगाव येथील नदिवर पाणी अडविण्यासाठी सन २००१/२००२च्या सुमारास सिमेंट बंधारा बांधला गेला आहे या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीतील विहिरीसाठी व जळके पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीसाठी चांगला फायदा होतो .मात्र दिनांक २७,२८सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे या सिमेंट बांधच्या दोन्ही बाजु या कोरल्या गेल्या आहेत एका बाजूचा भराव वाहुन गेला आहे त्यामुळे या साठवण बंधाऱ्यातुन पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
त्यामुळे वाहुन गेलेला भराव लवकर भरून बंद करणे गरजेचे आहे अन्यथा या ठिकाणी भविष्यात पाणी साठवून होणार नाही व या परिसरातील शेतकऱ्यांच्या विहीरसाठी हि चिंतेची बाब आहे या बंधाऱ्याची जळके सरपंच चिरंजीव चंद्रभान मोरे उपसरपंच ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर जळके पोलिस पाटील संजय चिमणकारे यांनी पाहणी केली आता परिसरातील शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे वाहुन जाणारे पाणी थांबण्याची प्रशासन काय पाऊले विचलित आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.