जळगाव : प्रतिनिधी
पाण्याची मोटार लावून पाणी वाया घालू नकोस. पाण्याची मोटार जळून जाईल, असे बोलल्याचा राग येऊन मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यासह पाय, पोटावर लोखंडी हातोडीने मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजता खंडेराव नगरात घडली.
या प्रकरणी लहान भावाच्या फिर्यादीवरून मोठ्या भावाविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मंगलसिंग सुंदरलाल खरारे व मोठे भाऊ विजय खरारे हे हे खंडेरावनगर येथे वास्तव्यास आहे. त्यांच्यात वाद होऊन विजय खरारे यांनी मंगलसिंग यांना हातोडी मारली.