धरणगाव : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिव महोत्सवात लहान बाल गोपालांनी शिवराज्याभिषेकाचा देखावा सादर करून प्रेक्षकांचे मने जिंकले यावेळी रंगीबेरंगी पोशाखाने तसेच शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. धरणगाव येथील आर-टेक क्लासेसच्या वतीने इयत्ता ५ ते १० वर्गाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा मध्ये यश संपादन केल्याबद्दल तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिव महोत्सवा चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प रा सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर अरुण कुलकर्णी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनील चौधरी, डॉक्टर संजीव कुमार सोनवणे, जेष्ठ पत्रकार बी आर महाजन,व्याख्याते सतीश शिंदे, अँड स्वाती निकम, वैशाली पवार, समाधान पाटील, भारती चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांचा स्वागत व सत्कार बुके व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. प्रास्ताविक म्हणून क्लासचे संचालक जितेंद्र चखाले यांनी केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बालगोपालांचा शिव महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित राज्याभिषेक देखावा, नाटिका, विविध हिंदी-मराठी गाणी, पोवाडे यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलीत.
तसेच चित्रकला स्पर्धा वकृत्व स्पर्धा आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी यामध्ये यश प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मनोगत म्हणून अँड स्वाती निकम, डॉक्टर संजय कुमार सोनवणे, सतीश शिंदे, बी आर महाजन, सुनील चौधरी, समाधान पाटील यांनी मनोगत व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपटावर मार्गदर्शन केले.यावेळी व्याख्याते सतीश शिंदे यांनी वीर रसामध्ये शिवाजी महाराजांवर प्रबोधन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया सोनवणे यांनी केले तर आभार नेहा गुप्ता यांनी मानले.