प्रतिनिधी प्रवीण पाटील: जिल्ह्यात 27 व 28 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अनेकांचे नुकसान झाले आहे यात तालुक्यातील वसंत वाडी मोठ्या प्रमाणात मातीच्या घरांची पडझड झालेली आहे गावातील घरांचे पंचनामे व्हावे यासाठी पोलीस पाटील यांची वारंवार संपर्क करीत आहेत.
वंसतवाडी या.जळगाव येथे दिनांक २७,२८ सप्टेंबर झालेल्या मुसळधार पावसामुळे या गावात मातीच्या घरांची पडझड झाली आहे. यासाठी येथील नागरिकांना प्रतिक्षा आहे शासकीय मदतीची या गावात मातीच्या काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत यात वसंतवाडी तांडा येथे अरुण काळु चव्हाण,सदा ज्योतीराम जाधव ,वसराम गणपत राठोड,राजु रतन राठोड,इंद्र हजारी चव्हाण, रामदास ताराचंद चव्हाण,ईंदल गोविंदा चव्हाण तर वसंतवाडी प्लांट भागात बालु पोपट पाटील, शोभाबाई प्रभाकर पाटील यांच्या घरांच्या अल्प नुकसान असल्याने शासन मदत मिळेल कि नाही या शंकेमुळे नागरिक पंचनामे करण्यास तयार होत नाही परंतु नागरिकांनी ज्यांचे खरोखर नुकसान झाले आहे त्यांनी नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे असे जळके पोलिस पाटील संजय चिमणकारे यांनी भ्रमणध्वनी वरून तलाठी नितिश ब्याहडे यांच्याशी संपर्क साधला आहे.