Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ब्रेकिंग : बदला घेण्यासाठी बाप चक्क महिला वेशात पिस्तुल घेवून !
    क्राईम

    ब्रेकिंग : बदला घेण्यासाठी बाप चक्क महिला वेशात पिस्तुल घेवून !

    editor deskBy editor deskFebruary 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बापाने थेट जळगाव कोर्ट परिसरात महिलेचा ड्रेस परिधान करीत संशयित आरोपींना आज न्यायालयात आणणार असल्याची माहिती मिळाल्याने कोर्टात येत संशयित आरोपींना ठार मारण्यासाठी बाप आला होता. पण त्याची एक चूक पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर सर्व सत्य बाहेर आले आहे.

    मिळालेली माहित अशी कि, भुसावळ तालुक्यातील नशिराबाद येथे सप्टेंबर मध्ये धम्मप्रिया सुरळकर याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित आरोपीना आज कोर्टात आणण्यात येणार होते. याची भनक मयत मुलाच्या वडिलांना लागली होती. तोच बदला घेण्यासाठी बापाने एका मुलाच्या मित्रासोबत आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास महिलेचा ड्रेस परिधान करीत पर्समध्ये गावठी पिस्तुल घेवून सोबत ५ जिवंत काडतूस घेत एका मंदिरावर तो बसला व त्याच ठिकाणी त्याची चूक पोलिसांनी लक्षात घेतली व त्याला ताब्यात घेवून शहर पोलिसात आणले असता त्याने सर्व सत्य सांगण्यास सुरुवात केली.

    यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलीस कर्मचारी तेजस मराठे, योगेश इंधाटे, गजानन बडगुजर, उमेश भांडारकर, शहर वाहतूक शाखेचे परमेश्वर जाधव यांनी धाडसी कारवाई करत पथकाने या संशयित आरोपी भूसावळातील पंचशील नगरातील रहिवासी मनोहर आत्माराम सुरळकर(वय ५०) याला अटक करीत असतांना झटापटीत एक संशयित आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. आपण आपल्या मुलाचा बदला घेण्यासाठी येथे आलो असल्याची कबुली मनोहरने दिली आहे. शहर पोलिसांच्या पथकामुळे त्याचा डाव उधळून लावण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस निरीक्षक ठाकूरवाड यांनी शहर पोलीस ठाण्यात येवून चौकशीला सुरूवात केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.