• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !

अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
February 20, 2023
in क्राईम, धरणगाव
0
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !

अमळनेर : प्रतिनिधी 

शिरपूरहून जामनेरला गुरे वाहून नेणाऱ्या मिनी ट्रकचा पाठलाग केला. करून पकडण्यात आले. चालकाला मारहाण करून वाहन जाळून टाकण्यात आले. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार १३ रोजी पहाटे धरणगाव रस्त्यावर सतीमाता मंदिराजवळ घडली.

संदीप रमेश शिरसाठ (रा. सुंदरगढी, चोपडा) हा १२ रोजी मालवाहू चारचाकी घेऊन शिरपूर येथील गुरांच्या बाजारात गेला होता. तेथील व्यापारी विजय शिवाजी पाटील यांच्याकडील १० गोहे घेऊन त्याला जामनेर तालुक्यातील नेरी येथे जायचे होते. यासाठी हातेड जळोद मार्गे तो येत होता. हातेड गावाजवळ वाहनात गुरे असल्याचे पाहून काही जणांनी दोन चारचाकी वाहनातून पाठलाग सुरु केला. शेवटी धरणगावनजीक सतीमाता मंदिराजवळ दोन्ही वाहनांनी गुरांनी भरलेले वाहन अडवले.

दोन्ही वाहनात असलेल्या सात जणांनी चालकाला मारहाण केली. या सातही जणांनी दहा गुरे उतरवून सोडून दिली आणि वाहन जाळून टाकले. संदीप हा कसाबसा चोपडा येथे पोहोचला व उपचार केले. दवाखान्यातून आल्यावर अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून सात अज्ञात व्यक्तीविरुद्ध दंगल व जाळपोळ केल्याचा अमळनेर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास हेकॉ. मिलिंद बोरसे करीत आहेत.

Previous Post

एमआयडीसी पोलिसांची कारवाई : सुरा घेवून फिरणाऱ्याला केली अटक !

Next Post

भाडेकरूने घरमालकिणीसोबत जुळविले प्रेम अन घडल अस काही !

Next Post
खबबळजनक : सावत्र मुलाकडून आईचा विनयभंग

भाडेकरूने घरमालकिणीसोबत जुळविले प्रेम अन घडल अस काही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group