जळगाव : प्रतिनिधी
शहरातील सिंधी कॉलनीजवळील एका हॉस्पिटल समोर बेकायदेशीररित्या हातात लोखंडी सुरा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून लोखंडी सुरा हस्तगत केला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री १० वाजता संबधित युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार तलवारी, सुरे लाठ्याकाठ्या सोबत बाळगण्याची परवानगी दिलेली नसताना शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील एका हॉस्पिटल समोर संशयित आरोपी आकाश उर्फ मट्या अनिल बागडे (वय २८, रा. संजय गांधी नगर ) हा हातात लोखंडी सुरा घेऊन फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी सायंकाळी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील लोखंडी सुरा हस्तगत केला आहे. याबाबत पो.कॉ. किरण पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.