Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रुद्राक्ष महोत्सवातून परतताना तरुणाचा मृत्यू !
    क्राईम

    रुद्राक्ष महोत्सवातून परतताना तरुणाचा मृत्यू !

    editor deskBy editor deskFebruary 19, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाममध्ये रुद्राक्ष महोत्सवात भाविक जात आहे. या ठिकाणी अनेक भाविक हरविले तर खान्देशातील ५ महिलासह १ लहान मुलाचा मृत्यू विविध कारणाने झाला असतानाच पुन्हा एका धक्कादायक बातमी समोर आली आहे.

    भुसावळातील तरुण भाविकांना घेवून गेला होता. त्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. खंडवा शहरापासून काही अंतरावर महामार्गावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता हा अपघात घडला. मंगल पाटील (४२, कृष्ण नगर, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील कृष्ण नगरातील मंगल पाटील हा तरुण मध्यप्रदेशातील खाजगी लक्झरीवर क्लीनर म्हणून कार्यरत होता. भाविकांना कथा श्रवणासाठी सिहोर येथे खाजगी लक्झरीने घेवून गेला होता व परतीच्या प्रवासात खंडवा शहरापासून काही अंतरावरील महामार्गावरील एका हॉटेलवर दुपारी भाविक नाश्ता करण्यासाठी थांबले. त्याचवेळी हॉटेलमध्ये काही वस्तू राहिल्याने ती घेण्यासाठी मंगल रस्ता ओलांडत असताना दुसऱ्या एका लक्झरी वाहनाने त्यास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू ओढवला.

    या घटनेने भुसावळ शहरातील कृष्ण नगरात शोककळा पसरली. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, मुले, आई, वडील असा परीवार आहे. मंगल हा घरचा कर्ता पुरूष होता, हातमजुरी करणार्‍या गरीब कुटुंबावर मंगलच्या मृत्यूने मोठे संकट ओढवले आहे. शनिवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक किरण कोलते यांनी दिली. लक्झरीवर क्लिनर असलेल्या मंगलचा दुसऱ्या एका लक्झरीच्या धडकेने प्राण गेले, या दुर्दैवी योगायोग असलेल्या या घटनेने भुसावळ शहरातील कृष्ण नगरात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.