प्रतिनिधी (अमोल पाटील) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे चांदसर, रेल, लाडली या गावांत घरांची पडझड झालेली असून गावांमधील शेतीशिवारात पुराचे पाणी घुसलेले आहे. शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची सर्व कल्पना पालकमंत्री यांनी दिला असून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे असल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना शेतकरी ग्रामस्थ अस्वस्थ केले.
अतिवृष्टी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भल्या पहाटे जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील अधिकाऱ्यांना घेऊन त्या गावांमध्ये पोहोचले व तेथील ग्रामस्थांना धीर दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांना परिस्थितीबाबत अवगत केले असता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळविण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे .याप्रसंगी रेल येथील सरपंच प्रशांत पाटील,छोटू भाऊ, पंडित पाटील, रमणअण्णा, अरुण दादा, गोपाळ आबा, भरत आबा, मंगल पाटील, बापूसाहेब रमण, सोनूभाऊ, तलाठी नम्रता पाटील , ग्रामसेवक श्याम पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.