शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच काल जळगाव जिल्हा दौरा झाला होता. त्यांना यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना धनुष्याबाण देत सन्मान करण्यात आला होता. व लागलीच दुसऱ्या दिवशी शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाले यावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ना.पाटील म्हणाले कि, जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या विकास कामाचे भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्यात आले होते. व आज धनुष्यबाण चिन्ह मिळालेले आहे. हा जळगाव जिल्ह्याचा आशीर्वाद बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळाले आहे. कालचा नुसता योगा योग होता पण आज ते शक्य झाले त्यामुळे अजून बाळासाहेबांची शिवसेना बळकट होणार महाशिवरात्रीच्या पूर्वी हा निकाल झाल्याने हा देवाचा हि आशीर्वाद म्हणता येईल असेही गुलाबराव पाटील म्हणाले.