अमळनेर : जितेश चव्हाण
मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेरेश्वर धाममध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या रुद्राक्ष महोत्सवात अनेक राज्यातून भाविक लाखोच्या संख्येने येत आहे. तर पहिल्याच दिवशी एका महिलेचा मृत्यू याठिकाणी झाला होता तर दुसऱ्या दिवशी खान्देशातील दोन महिलेचा मृत्यूची बातमी समोर येत नाही तोच आज पहाटेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील एका गावातील दोन भाविक महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
सिहोर येथील कुबेरेश्वर धाममध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या रुद्राक्ष महोत्सवात पहिल्या दिवशी गुरुवारी रुद्राक्ष घेण्यासाठी तब्बल २० लाख लोकांची गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती उद्भवली. याच गर्दीत भोवळ येऊन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील ५० वर्षीय महिलेचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. तर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील दोन महिलाच मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती, त्यानंतर काही वेळातच पुन्हा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील दोन महिला भाविक सिहोर येथून रात्री १२ वा. निघालेले असतांना असतांना इंदौर हायवेवर जुलवानिया गावाजवळ पहाटे ५ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या अपघातात कमलबाई आत्माराम बिरारी, शोभाबाई लुकडू बिरारी या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.