देशातील सर्वात विश्वसनीय सरकारी संस्थांपैकी एक पोस्ट ऑफिस हे आहे. देशातील कोट्यवधी लोक बचत करण्यासाठी पोस्ट ऑफिसवर अवलंबून आहेत. पोस्ट ऑफिसचे जाळेही देशभर पसरलेय. परंतु अजूनही अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे कनेक्टिव्हिटी तितकीशी चांगली नाही. आपल्या नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी, इंडियन पोस्टने काही काळापूर्वी फ्रँचायझी सेवा सुरू केली होती. यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिस फ्रँचायझी सहज घेऊ शकता. याद्वारे तुम्ही तुमच्या परिसरात पोस्ट ऑफिसची सुविधाही देऊ शकता. चला जाणून घेऊया या योजनेबद्दल…
पोस्ट ऑफिसमध्ये फ्रँचायझी योजना
पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, पोस्ट ऑफिस फ्रँचायझीचे दोन प्रकार आहेत. प्रथम आउटलेट फ्रेंचाइजी आणि फ्रेंचाइजी पोस्टल एजंट. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतीही फ्रँचायझी योजना निवडू शकता.
कोण अर्ज करू शकतो?
18 वर्षांवरील कोणीही फ्रँचायझीसाठी अर्ज करू शकतो. अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य पोस्ट खात्यात कर्मचारी नसावा. त्याचबरोबर सरकारी मान्यताप्राप्त शाळेतून आठवी उत्तीर्ण असावा.
पोस्ट ऑफिस फ्रँचायझी खर्च
आउटलेट फ्रँचायझी पोस्टल एजंट्सपेक्षा अधिक किफायतशीर आहेत. कारण यात फक्त सर्व्हिसिंगचा समावेश आहे. स्टेशनरीवरील खर्चामुळे पोस्टल एजंट थोडे महाग आहेत. पोस्ट ऑफिस फ्रँचायझीकडे किमान 200 चौरस फूट ऑफिसची जागा असणे आवश्यक आहे. याशिवाय 5000 रुपये सिक्योरिटी अमांउट असावी. ते सबमिट केल्यानंतर, तुम्हाला तुमची फ्रेंचाइजी उघडण्याची परवानगी मिळेल.
पोस्ट ऑफिस फ्रँचायझी उघडण्याची कमाई
फ्रँचायझी उघडल्यानंतर तुम्ही टपाल तिकीट, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर इत्यादी अनेक प्रकारच्या सेवा देऊन कमाई करू शकता. पोस्टल पोस्ट बुक केल्यावर तुम्हाला 3 रुपये, स्पीड पोस्टवर 5 रुपये, टपाल तिकीट आणि स्टेशनरीच्या विक्रीवर 5 टक्के कमिशन मिळते.