जळगाव : प्रतिनिधी
शिंदे-फडणवीस सरकार जेव्हापासून आले आहे तेव्हा पासून कामांचा झपाटा लावला आहे. आमच्या कडे असलेल्या या वेळेत आम्ही ट्वेंटी ट्वेंटीच्या मॅच प्रमाणे आम्ही कामांचा जनतेला कामे करण्याचा धडाका सुरू आहे. राज्यातील उद्योजक, जनता आदी क्षेत्रातील समस्या सोडविण्याचा आमचा पारदर्शक कारभार राहणार असणार आहे, असे शाब्दीक टिका ठाकरे सरकारवर यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत जळगाव येथे विकास परिषद कार्यक्रमात त्यांनी केली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यामाने जळगाव जिल्हा विकास परिषद गुरूवारी जळगाव येथील छत्रपती संभाजी राज्य नाट्यगृहात झाली. परिषदेच्या प्रमुख पाहूणे म्हणून रेाज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी प्रोजेक्ट प्रमुख संगिता पाटील, चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सदस्य सुधाकर देशमुख उपस्थित होते. पुढे बोलतांना ना. सामंत म्हणाले की, ठाकरे सरकारने उद्योग आणण्यासाठी काहीच केले नाही, जे उद्योग येणार होते त्यांना जागेसाठी ङ्गिरवा ङ्गिरव केल्याने ते उद्योग बाहेर राज्यात गेले. शिंदे-फडणवीस सरकारच्या कालावधीत या कंपन्या बाहेर गेल्या याचा चुकीचा प्रसार विरोधकांनी करून महाराष्ट्राला त्यांनी बदणाम करण्याचा प्रयत्न केला. परंतू आता राज्यात मोठ मोठ्या कंपन्या गुंतवणूक करणार असून भविष्यात १ लाख ४० हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. जळगाव जिल्ह्यात देखील नविन उद्योगांना चालना दिली जाणार असून उद्योजगांच्या बाबत हे सरकार सकारात्मक आहे असे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या जळगाव जिल्हा विकास परिषदेत केले.
नवीन एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न
जळगाव जिल्ह्यात पाच ठिकाणी नविन एमआयडीसी आणण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यानुसार नविन उद्योग सोबत या एमआयडीसी विकसीत करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच जळगाव जिल्ह्यातील व्यापार्यांच्या अडीअडचणी त्वरीत सोडविल्या जाणार आहे. प्रश्न मार्गी लावणे तसेच विविधी विषयांवर पुढील आठवड्यात व्यापारी, संघटनेचे पदाधिकारी व अधिकारी यांची मुंबईला बैठक घेवून तुमच्या मागण्या ९० टक्के पूर्ण केल्या जाणार असे आश्वासन यावेळी ना.सामंत यांनी दिले.
लोकांमध्ये जावून काम करणारे सरकार
ठाकरे सरकार हे एसीमधून बसून कार्यालयातून ते चालवित होते. ते लोकांमध्ये जात नव्हते, त्यामुळे लोकांच्या भावना त्यांना कळल्या नाही. त्यांचे सरकार गेल्यामूळे दररोज सकाळी उठून त्यांची चिडचिड दिसत आहे. असे ठाकरे सरकार यांच्यासह शिवसेनेचे खासदार संजय सावंत यांच्यावर देखील शाब्दीक टिका त्यांनी केली.