जळगाव : प्रतिनिधी
इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून महिलांचे फोटो टाकून अश्लील मजकूर लिहून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका महिलेच्या पतीने सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.
त्यानुसार, ५ ते १४ फेब्रुवारीच्या कालावधीत त्यांच्या भाचीच्या नावाने बनावट अकाउंट बनवून एकाने त्यांची पत्नी व मामीचा फोटो अपलोड केले.