भुसावळ : प्रतिनिधी
सुरक्षीत तसेच शिस्तबध्द कामकाजासाठी ओळखले जाणार्या रेल्वे विभागाचा भोंगळ कारभार उघकीस आला आहे. नागपूरकडून मुंबईकडे निघालेली 90 कंटेनर असलेली मालगाडी बेपत्ता झाल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत रेल्वे सुत्राकडून मिळालेली माहीती अशी की, 1 फेब्रुवारी रोजी निघालेली नागपूरकडून मुंबईकडे निघालेली 90 कंटेनर असलेली मालगाडी ही चार ते पाच दिवसात जेएनपीटी बंदरात पोहोचणे अपेक्षित होते. पण तेरा दिवसानंतरही ही मालगाडी जेएनपीटी बंदरात पोहोचली नाही. जणू ही गाडी चक्क गायब झाल्या सारखाच प्रकार घडला.
FOIS मधून गाडी झाली अदृष्य…..
नागपूरकडून मुंबईकडे निघालेली रेल्वे PJT1040201 या क्रमांकाच्या मालगाडीला 90 कंटेनर आहे. यात उच्च प्रतीचा तांदूळ, कागद, प्लास्टिकच्या वस्तू, केमिकल्स आणि इतर निर्यात करण्याच्या वस्तू आहेत. 1 फेब्रुवारी रोजी ही मालगाडी नागपूरकडून मुंबईकडे जात आहे. रेल्वेतर्फे प्रत्येक मालगाडीचे रिअल टाईम लोकशन घेतले जाते. हे लोकेशन भारतीय रेल्वेच्या फ्रेट ऑपरेशन इन्फॉर्मेशन सिस्टीम FOIS मधून घेतले जाते. भारतीय रेल्वेच्या फ्रेट ऑपरेशन इन्फॉर्मेशन सिस्टीम FOIS मधून अदृश्य झाले होते. FOIS ही रेल्वे डब्यांना लाइव मॉनिटर करण्याची भारतीय रेल्वेची यंत्रणा आहे. मात्र FOISमधून या गाडीचे लोकेशन अदृश्य झाले होते.दरम्यान एक नवखा अधिकारी आणि प्रशासनाचा भोंळग कारभारामुळे हा प्रकार घडला. दरम्यान, ही गाडी नागपूरच्या मिहान इनलँड डेपो (आयसीडी) मधून ही मालगाडी एक फेब्रुवारीला निघाली होती. पण ही मालगाडी बेपत्ता झाली नसून काही तांत्रिक कारणामुळे सेंट्रल रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजनमध्ये शेगावजवळ थांबवण्यात आली होती, असे रेल्वे प्रशसनाचे म्हणने आहे. ही गाडी काल सयंकाळी ५:४० वाजता जेएनपीटीकडे रवाना झाली. दरम्यान या प्रकाराबाबत रेल्वे प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली होती