चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका २५ वर्षीय तरुणीचा एका २७ वर्षीय तरुणाशी लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासोबत २५ वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. गेल्या २०२१ पासून ते आजपर्यत नांद्रे गावातील संशयित आरोपी समाधान पाटील (वय २७) याने तरुणीला तु माझ्याशी लग्न कर असे बोलून त्यास तरुणीने नकार दिल्याने त्याचे वाईट वाटून तरुणीच्या गावात येत तरुणीवर लक्ष ठेवत तरुणी घराबाहेर पडल्यावर तिचा पाठलाग करीत तिला शिवीगाळ व दमदाटी करून तिला धमकी दिली कि माझे जगून फायदा नाही मी तुमच्या शेतात फाशी घेतो व तुझ्या कुटुंबातील सर्वांची नावे त्यात टाकून देत तुझे पपा रोज बाहेरगावी जातात त्यांना मी माझ्या मोठ्या वाहनाने गाडी खाली दाबून मारून टाकेल अशी धमकी देत तरुणीचा ज्या ठिकाणी साखरपुडा झालेला आहे. त्या तरुणाची माहिती काढून त्याच्या सोबत चाटिंग करीत साखरपुडा तोडण्याचा प्रयत्न केल्याने तरुणीची बदनामी झाली. या प्रकरणी तरुणीने मेहुणबारे पोलिसात धाव घेत संशयित आरोपी समाधान पाटील(वय २७) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पीएसआय.राजू सांगळे हे करीत आहेत.