धरणगाव : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असतांना अनेक पक्षातील शेकडो कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत (शिंदे गटात) येणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. त्यापूर्वीच धरणगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्षांनी गटनेटे पप्पू भावे यांच्या उपस्थिती केला.
जळगाव ग्रामीण मतदार संघातील सर्वच पक्षातील शेकडो कार्यकर्ते आज राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात आज अनेक पक्षांना धक्का बसणार असून काल दि १५ फेब्रुवारी रोजी धरणगावच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संभाजी कंखरे यांनी राष्ट्रवादीला राम राम करून शिंदे गटात प्रवेश केला आहे.