चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील नागलवाडी येथे सासू व सुनेचे एकाच दिवशी निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दोघींची अंत्ययात्रा १४ तारखेला सायंकाळी पाच वाजता एकाच वेळी काढण्यात आली. दोघींचाही मृत्यु किरकोळ आजाराने झाला. अरुणाबाई यशवंत राजपूत (६५) यांचे किरकोळ आजाराने पहाटे सात वाजून दहा मिनिटांनी चोपडा येथील दवाखान्यात निधन झाले.
त्यांच्या निधनानंतर नागलवाडी येथे घरी आणण्यात आले, त्यांच्या निधनाची वार्ता गावात व नातेवाईकांना सर्वत्र देण्यात आली. दुपारी दोन वाजता अरुणाबाई याच्यावर अंत्यसंस्कार होणार होते मात्र याच वेळी वयोवृद्ध सासुबाई कौसाबाई हुकुमसिंग राजपूत (९३) यांचा देखील वृद्धापकाळाने दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी राहत्या घरी निधन झाले. सुनेचे अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना सुनेच्या पाठोपाठ सासूचेही दुख:द निधन झाल्याने नागलवाडी गावात सासू कौसाबाई राजपूत व सून अरुणाबाई राजपूत यांच्यावर एकाच वेळी सायंकाळी पाच वाजता अंत्ययात्रा करण्याची वेळ आली . कौसाबाई यांच्या पश्चात तीन मुले ,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. यशवंत राजपूत नागलवाडी गावात मोठा परिवार असून ते उत्तम शेती करतात. आईचे वृद्धापकाळाने निधन झाले.आई सोबत पत्नी देखील सोडून गेल्यामुळे यशवंत राजपूत यांच्यावर साहजिकच दुःखाचा डोंगर कोसळला होता.यशवंत राजपूत व त्याच्या कुटूंबियांना गावकऱ्यांनी धीर दिला.