जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा हा गिरणा नदी पात्रातून होत असतांना आज दुपारच्या सुमारास अचानक गिरणा नदी पत्रात पोलिसांनी धडक कारवाई केल्याने वाळूमाफियामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
मिळालेली माहिती अशी कि, जळगाव शहराला लागून असलेल्या बांभोरी गावानजीकच्या गिरणा नदी पात्रात आज धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी थेट नदीपात्रात जात वाळूमाफियांना पोलिसांचे पथक दिसताच वाळूमाफियानी या परिसरातून सर्वच वाहनाची पळवापळव केली, पोलीस निरीक्षक राहुल खताळ एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी थेट वाळू भरणाऱ्या मजुरांना चांगलाच धडा शिकविला आहे. आजपासून पुढे कधीही या नदीत चोरटी वाळू भरायची नाही असा दमच त्यांनी यावेळी मजुरांना दिला असल्याने वाळूमाफियासह मजुरांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
सदर पथकात पीएसआय अमोल गुंजाळ, पीएसआय संतोष पवार , समाधान भागवत, पो.विजय चौधरी, श्यामरावं भिल, अमोल पाटील दीपक पाटील,वैभव बाविस्कर,विनोद संदाशिव,मिलिंद सोनार यांनी सहभाग घेतला.