धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीतर्फे बांधण्यात आलेल्या महिला शौचालयाचे लाेकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ३० लाखांचा निधी या कामावर खर्च झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेबांची शिवसेना मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख व धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे, ज्येष्ठ शिवसैनिक दामू पाटील, माजी सभापती हेमराज पाटील, म्हसावदचे सरपंच गोविंद पवार, पाळधी बुद्रुकच्या सरपंच अलका पाटील, उपसरपंच चंदन कळमकर, ग्रामपंचायत सदस्य तुषार मोरे, ग्रामसेवक दीपक पाठक, यशवंत पाटील, अरुण पाटील, सागर धनगर, ग्रामपंचायतचे शिपाई शिवाजी पाटील व गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित हाेते.