• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यातील गावे, वस्ती आणि रस्त्यांची नावे जातीवाचक असल्यास ती बदलवा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 29, 2021
in जळगाव, सामाजिक
0
जिल्ह्यातील गावे, वस्ती आणि रस्त्यांची नावे जातीवाचक असल्यास ती बदलवा

जिल्हाधिकारी अभिजित राऊत


लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्ह्यातील गावे, वस्ती आणि रस्त्यांची नावे जातीवाचक असल्यास ती बदलून अशी सर्व गावे, वस्ती आणि रस्त्यांना महापुरुष व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

सामाजिक न्याय विभागाने जातीवाचक नावे बदलण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गठित जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी बैठकीस उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृध्दीगंत होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील गावे, वस्ती आणि रस्त्यांची नावे जाती वाचक असल्यास ती बदलावीत. त्याऐवजी थोर महापुरुषांची नावे किंवा लोकशाही मूल्ये वृध्दिंगत होतील, अशी नावे द्यावीत. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी समाजकल्याण विभागाला सहकार्य करावे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 33 जातीवाचक वस्त्यांची नावे बदलण्यात आली असून त्यांना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त पाटील यांनी बैठकीत दिली. त्यापैकी भुसावळ तालुका-3, भडगाव-1, एरंडोल-3, पाचोरा-7, रावेर-1, जामनेर-10, अमळनेर-2 या वस्त्यांची माहिती प्राप्त झाली आहे. तर यावल, बोदवड, चाळीसगांव, चोपडा, धरणगांव, जळगांव, मुक्ताईनगर, पारोळा या तालुक्यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.

Previous Post

गिरणा धरणातून पाणी सोडणार , काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा !

Next Post

डोंगरी नदीत  तरुण बेपत्ता; शोधकार्य सुरू

Next Post
डोंगरी नदीत  तरुण बेपत्ता; शोधकार्य सुरू

डोंगरी नदीत  तरुण बेपत्ता; शोधकार्य सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group