चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांच्या पथकान पकडून तब्बल १५ लाख १५ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा गावाजवळून वाळू वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने पोलीस गस्तीवर असतांना दि १२ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास एम.एच.१८.बी.जे.२०५२ नंबरचे डंपर अवैध वाळू वाहतूक करीत असल्याचा संशय आल्याने चाळीसगाव शहर पोलीस स्थानकाचे पोकॉ.समाधान पाटील यांनी थांबविली असता. त्या डंपरमध्ये ४ ब्रास वाळू मिळून आली. यावेळी हे डंपर कुणी शासकीय अधिकारी पकडू नये यासाठी डंपर मालक गणेश पाटील (रा.देवळी ता.चाळीसगाव) हा देखील एका चारचाकी वाहनाने या डंपरच्या सुरक्षा देत होता. यावेळी पो.कॉ.समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसात डंपर मालक – चालकासह एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून १० लाख किमतीचे डंपर, १५ हजार रुपये किमतीची अवैध वाळू त्यासोबत ५ लाख किमतीची चारचाकी गाडी असा एकूण १५ लाख १५ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेत संशयित आरोपी गणेश पाटील, रामदास चव्हाण, निखील कुडे याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि सचिन कापडणीस हे करीत आहेत.