लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: गिरणा धरण आज दि. 29 रोजी दुपारी 11 वाजे पर्यंत 90 टक्के भरले असून, वरून येणार पुराच्या पाण्याचं येवा बघता आज दुपारनंतर धरण पूर्ण भरण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जास्तीचे पुराचे पाणी खालच्या बाजूस गिरणा नदीत सोडण्यात येईल, तरी नदी काठावरील नागरिकांनी नदीत जाऊ नये, तसेच गुरे ढोरे नदीजवळ नेऊ नयेत ,पुराचे पाणी 20ते 25 हजार cusecs सोडण्याची शक्यता आहे, या आधी मन्याड धरणातून 19हजार cusecs पाणी गिरणा नदीत चालू आहे, तरी सर्व नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.