लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव तालुक्यातील कंडारी बु १४ वित्त योजने अंर्तगत झालेली सर्व काम हे कागदोपत्री झालेली असुन,वित्त योजने अंतर्गत आलेल्या पैश्याचा कुठल्याही प्रकारचे काम आमच्या ग्रामपंचायतीत झालेले नाही गावातील मजूर झालेली घरकुले सुद्धा गावात दिसत नाही ग्रामपंचायतीला आलेला सामान देखील गहाळ आहे.
याबाबत सरपंच, प्र, सरपंच व ग्रामवसेक याच्यावर कठोर कार्यवाही होऊन याच्याकडून सदर कामकाज तपासून व झालेल्या भ्रष्टाचारांची चौकशी व्हावी व संबधीत लोकांनकडून ग्रामपंचायतीचे झालेल्या नुकसान भरपाई वसुल करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मुसा सरोवर पटेल, दगा रहेमान पटेल यांनी जिल्हाधिकारी ,मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. जळगांव.,गटविकास अधिकारी पंचायत समिती, धरणगांव. याना लेखी निवेदनातून केली आहे.
दगा पटेल व मुसा सरोवर पटेल., ग्रामपंचायत सदस्य, कंडारी बु ता. धरणगांव यांनी ग्रामपंचायतीला १४ टक्के वित्त योजने अंर्तगत झालेली सर्व काम हे कागदोपत्री झालेली असुन, वित्त योजने अंतर्गत आलेल्या पैश्याचा कुठल्याही प्रकारचे काम आमच्या ग्रामपंचायतीत झालेले नाही., तसेच घरकुले हे सुध्दा गावांत मंजुर झालेली घरकुले (सन २०१० ते २०१९) ही सुध्दा गावात बांधलेली आढळून येत नाही. तसेच ग्रामपंचायत ला मिळालेले संगणक (काम्प्युटर) सुध्दा आज तागायत मला ग्रामपंचायत मध्ये आढळून आलेले नाही., शासनाने दिलेले वायरलेस सेट सुध्दा सरंपच, ग्रामसेवक यांनी कुठे विल्हेवाट लावली यांची सुध्दा माहिती देखील देण्यात येत नाही असा आरोप ही त्यांनी केला आहे.
सन ३१/०३/२०१० ते सन ३१/०३/२०१९ पर्यत शौचालय बांधकामासाठी आलेल्या जि.प.च्या माध्यमातून निधी प्राप्त झालेला होता. तसेच त्यांनी बोअरवेलच्या ०३ सेट.. इले. मोटर, पाईप व वायर इ. सुध्दा त्यांनी संगनमताने विकून टाकलेल्या दिसत आहे.
प्रोसिंडींग वर सह्या करण्यासाठी ग्रामसेवकांची सदस्यांना धमकी
त्या पैश्यांचा सुध्दा सरंपच व ग्रामसेवक यांनी संगनमताने हडप केलेली आहेत. प्र. सरपंच व ग्रामसेवक यांनी सरकारी अनुदान हे संगनमताने वरील भ्रष्टचार केलेला असुन तरी प्र. सरंपच व ग्रामसेवक हे मिटींग अजेंडा देतात व कोणत्याही दिवशी येवून मिटींग च्या प्रोसिंडींग वर सहया करुन घेत असतात. तुम्ही सहया केल्या नाही तर तुम्हला ग्रा.प. नियमाने तुला वरील पदावरुन कमी करण्यात येईल अशी धमकी देत असतात. सरपंच, प्र, सरपंच व ग्रामवसेक यांच्यावर कठोर कार्यवाही व्हावी.
उपोषणाचा दिला इशारा
झालेल्या भ्रष्टाचारांची चौकशी व्हावी व संबधीत लोकांनकडून ग्रामपंचायती चे झालेल्या नुकसान भरपाई वसुल करुन पैसे ग्रा.पंचायतीत भरुन मिळावी. तसेच आपण वरील अर्जाचा सखोल चौकशी न झाल्यास पंचायत समिती, धरणगांव येथे उपोषणाच करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.