जळगाव : प्रतिनिधी
चोपडा आणि जळगाव तालुकावासियांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी पाडळसरे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या तापी नदीवरील मोठ्या उंच ऐतिहासिक पुलाचे १३ फेब्रुवारी ऐवजी १६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे असे पालकमंत्र्यांनी आज बैठकीत सांगितले.
चोपडा आणि जळगाव तालुकावासियांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी पाडळसरे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या तापी नदीवरील मोठ्या उंच ऐतिहासिक पुलामुळे तीन तालुक्यांसोबत गुजराथ व मध्यप्रदेशच्या वाहनधारकांना लाभ होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
यासोबतच शिवाजी नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण, म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमीपूजन, बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम यासह धरणगाव तालुक्यातील विविध कामांचे भुमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याने या सर्व कार्यक्रमांचे सुक्ष्म नियोजन आवश्यक असल्याची सुचना पालकमंत्र्यांनी केली.