मुंबई : वृत्तसंस्था
नेहमी आपण रेल्वेने प्रवास करीत असतो. दूरचा प्रवास असल्याने एक रात्र तर नक्कीच आपल्याला रेल्वेमध्येच काढावी लागते. तुम्ही रात्री रेल्वेत शांत झोपलेले असतांना तुम्हाला माहित नसते कि आपल्या जवळ कोण येतय किवा कोण नाही, अशीच घटना एका प्रवासी सोबत झाली आहे त्यामुळे रेल्वेत प्रवास करतांना झोप आली तर अशी घटना आपल्या सोबतही घडू शकते. एक प्रवासी आणि त्याची पत्नी अहमदाबाद कोल्हापूर रेल्वे एक्सप्रेस गाडीतून प्रवास करीत असताना दोघांना लागली झोप. त्याचा फायदा घेत चोरटय़ाने प्रवाशाच्या पत्नीची पर्स लांबिवली आणि तो पसार झाला.
मात्र तो वसई शहरातील सीसीटीव्हीत पोलिसांना दिसून आल्याने पोलिसांनी त्याला भायखळा येऊन अटक केली. त्याचे नाव सुभान अहमद असे असून तो मूळचा डहाणू येथे राहमारा आहे. तो सराईत चोरटा असून त्याच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून चोरीस गेलेला ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच अन्य तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पोलिसांनी सुभान अहमदला अटक केल्यानंतर त्याच्याकडून महिला प्रवासाची पर्स हस्तगत केली आहे. या पर्समध्ये ६ लाख ३९ हजार रुपये किंमतीचे दागिने होते. त्याचबरोबर पोलिसांनी अन्य तीन गुन्ह्यातील चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत केले आहे. त्या तीन मोबाईलच्या किंमती २१ हजार, ४५ हजार आणि १६ हजार रुपये आहेत. सुभान अहमद हा सराईत चोरटा असून कल्याण, पुणो, भुसावळ आणि भरुच या रेल्वे स्थानकात त्याच्या विरोधात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 3क् जानेवारी रोजी एक व्यावसायिक त्यांच्या पत्नीसोबत अहमदाबाद कोल्हापूर एक्सप्रेसने प्रवास करीत होते. दोघेही पती पत्नी बोगी क्रमांक-५ मध्ये होते. प्रवासा दरम्यान त्यांना झोप लागली.
चोरटा सुभान याच गाडीतून चोरीसासाठी सावज हेरत होता. त्याने झोपलेल्या महिला प्रवासीला लक्ष्य केले. तिची पर्स लंपास केली. ही घटना सुरत ते भिवंडी रेल्वे स्थानका दरम्यान घडली असल्याने चोरटास सुभान हा सुरतपासून त्यांच्यावर पाळत ठेवून होता. चोरी करुन तो वसई रेल्वे स्थानकात उतरला. त्यानंतर तिथून तो पसार झाला. प्रवाशाला जाग येतात. त्याच्या पत्नीची पर्स चोरीला गेल्याचे कळाले. त्याने या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. चोरीस गेलेल्या पर्समध्ये लाखो रुपयांचे दागिने असल्याने हा तपास कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचने सुर केला. तपास पथकाने सुरत ते भिवंडी दरम्यान अनेक रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासले. वसई शहरातील सिसीटीव्हीत चोरटा सुभान पोलिसांना दिसून आला. त्याचा माग काढत पोलिसांनी त्याला भायखळा येऊन अटक केली. त्याला रेल्वे न्यायालयात हजर केले. रेल्वे न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी दरम्यान पोलिसांना त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबूली दिली. तसेच अन्य तीन गुन्ह्यातील मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले.
पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे आणि पोलिस उपायुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश चौगूले, पोलिस कर्मचारी राजेंद्र दिवटे, जर्नादन पुळेकर, रंजित रासकर, रविंद्र दरेकर, वैभव जाधव, स्मिता वसावे, महिंद्र कर्डिले, अजित माने, अजिम इनामदार आणि सोनाली पाटील यांच्या पोलिस पथकाने सुभान अहमदला शोधून काढले.