लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव तालुक्यात आलेल्या पंचायत राज समितिला पावसा अभावी व झुरखेडा गावात जाता आले नसल्याने धरणगाव पंचायत समिती येथे झालेल्या सभेत झुरखेडा गावातील विविध विकास कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार सुरेशआप्पा पवार (पाटील) यांनी मांडला. याची पंचायत राज च्या समितीने दाखल घेतली आहे.
याबाबत माहिती अशी की, गावातील ग्रामपंचायत मार्फत केलेल्या काम व त्यावरील खर्च, शौचालयात केलेला भ्रष्टाचार,१४ वा वित्त आयोगाच्या पैश्याची अफरातफर, मागील ग्रामसेवक यांचेकडून दप्तर गहाळ कसे झाले, दलित वस्तीत व गावातील वस्तीत केलेल्या निकृष्ट कोक्रेटिकरण याची चौकशी,भूमीगत गटार यामध्ये केलेले निकृष्ट दर्जाचे गावात केलेली कामे,गावात बांधलेल्या जिममधील सामानच गायब होणे, चौकशी,लेखा परीक्षण अहवाल,अपंग व्यक्तीसाठी किती निधी खर्च केला याचा तपशील, मासिक सभा घेतांना सरपंच यांची सही नाही ,सूचक अनुमोदन नसतांना कामांना मान्यता कोणी व कशी दिली असा सवाल सुरेश पाटील यांनी विचारला .
तसेच ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य नसतांना सभा कशी चालविली, अश्या कामाची व दप्तर चौकशीची मागणी तक्रारदार सुरेश पाटील यांनी केली होती . त्यानंतर पंचायत राज समिती यांनी पंचायत समिती धरणगाव येथे घेण्यात आलेल्या बैठकीत विस्तार अधिकारी बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदार सुरेशआप्पा पवार (पाटील) यांनी केलेल्या तक्रारीचा संपूर्ण अहवाल उद्या दि.२९ सप्टेंबर रोजी विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांना पंचायत राज समितीचे अध्यक्ष याच्या समोर ठेवायचा आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.