पुणे : वृत्तसंस्था
राज्यभरात चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे पुण्याची, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मोठ्या घटना घडत आहे. राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेचे इच्छूक असलेले उमेदवार राहुल कलाटे नाराज होते. त्यांनी अपक्ष निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केली सुद्धा पण याच निवडणुकीत त्यांची चर्चा राज्यभर होवू लागली आहे. त्याचे कारणही तसेच काही आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षीय उमेदवारांना हा अपक्ष उमेदवार नक्की भारी पडणार आहे अशी चर्चा राज्यभर होत आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यासह अजित पवार यांनी खास समजूत काढून देखील राहुल कलाटे यांनी कुणाचे हि काही न एकत अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यामुळे चिंचवड पोटनिवडणुकीत तिहेरी लढत पाहिला मिळत आहे. तर चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांच्या विरोधात चिंचवड येथील चाफेकर चौकात बॅनर लावण्यात आले आहे.
एका अपक्षची उमेदवारी खोक्यातून… नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दरी, एकदम ओक्के डोक्यातून… खरा शिवसैनिक अशा आशयाचा मजकूर लिहून राहुल कलाटे यांना विरोध दर्शविला आहे. या बॅनरची सद्या चर्चा सुरू झाली आहे. राहुल कलाटे यांनी अर्ज मागे न घेतल्याने शिवसेना त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे देखील शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख सचिन आहीर यांनी देखील सांगितले आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत शिवसैनिकांकडूनच कलाटे यांना विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, या बॅनरबाजीमुळे शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून याबाबत महाविकास आघाडीचे नेते काय भूमिका घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे, कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पक्षाचे नेते किरीट सोमय्या हे प्रचार करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आता राहुल कलाटे यांच्यावर पक्ष एक,दोन दिवसांत कारवाई करणार असल्याचे ठाकरे गटाचे उपनेते सचिन अहिर यांनी शुक्रवारी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन वरून मनधरणी केली होती. काल दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्या आगोदर माघार घेण्यासाठी सकारात्मक होते मात्र कार्यकर्त्यांनसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी मागे न घेण्याची निर्णय घेतला त्यानंतर तातडीने सायंकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.