मुंबई : वृत्तसंस्था
देशाचा अर्थसंकल्प झाल्यानंतर सोने व चांदीच्या दरात मोठी चढ उतार दिसून आली होती. तर गेल्या दोन दिवसात सोन्याचे भाव कमी झाले होते. तर १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५२,४०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५२,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. चांदी ७०,८०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,३५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५२,४०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५७,१६० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,४०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,१६० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,४०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,१६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,४३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,१९० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७०८ रुपये आहे.