Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्र्यांच्या दौ-याचा घेतला पालकमंत्र्यांनी आढावा !
    जळगाव

    मुख्यमंत्र्यांच्या दौ-याचा घेतला पालकमंत्र्यांनी आढावा !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 10, 2023Updated:February 10, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ई-भूमीपुजन होणार : वाहतूक व्यवस्था व कार्यक्रमाच्या नियोजनाची घेतली माहिती

    जळगाव प्रतिनिधी : चोपडा आणि जळगाव तालुका वासियांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी पाडळसरे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या तापी नदीवरील मोठ्या उंच ऐतिहासिक पुलाचे १३ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून या कार्यक्रमासाठी वाहतूक व्यवस्था, बैठक व्यवस्थेसह सर्व गोष्टीचे व्यवस्थित व सुक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत केल्या.*

    अजिंठा विश्राम गृहावर मुख्यमंत्र एकनाथजी शिंदे यांच्या दाैर्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी अमन मित्तल, जि.प.सीईओ डाॅ.पंकज आशिया,मनपा आयुक्त विद्या गायकवाड, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.किरण पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत येळाई व प्राजंल पाटील,प्रांताधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार नामदेव पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

    चोपडा आणि जळगाव तालुकावासियांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी पाडळसरे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या तापी नदीवरील मोठ्या उंच ऐतिहासिक पुलामुळे तीन तालुक्यांसोबत गुजराथ व मध्यप्रदेशच्या वाहनधारकांना लाभ होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

    यासोबतच शिवाजी नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण, म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भूमीपूजन, बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम यासह धरणगाव तालुक्यातील विविध कामांचे भुमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याने या सर्व कार्यक्रमांचे सुक्ष्म नियोजन आवश्यक असल्याची सुचना पालकमंत्र्यांनी केली. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.