जळगाव :प्रतिनिधी
शहरातील श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या ठिकाणी आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उभ्या असलेल्या ओमनी व्हॅनने अचानक पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली. याठिकाणी तात्काळ मनपाच्या अग्निशामक दलाने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या ठिकाणी आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उभ्या असलेल्या ओमनी व्हॅनने अचानक पेट घेतला होता. यावेळी व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली. यात व्हॅनचे हजारोंचे नुकसान झाले. यावेळी महापालिकेचे अग्निशामक दलाच्या एका बंबाने आग आटोक्यात आणली . दरम्यान उड्डाण पुलाच्या खाली असणाऱ्या एका दुकानासमोर उभ्या असलेल्या व्हॅनने पेट घेल्याचे वृत्त कळताच शेकडो नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली. यावेळी अग्निशमन दलाचे प्रकाश चव्हाण, गंगाधर कोळी, गिरीश खडके, संजय तायडे यांनी आग विझविली.