जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका ५३ वर्षीय वृद्धाचा व्हॉटसअपवर अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्या करिता पैश्याची मागणी करणाऱ्या विरोधात जळगाव सायबर पोलिसात दोन जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका ५३ वर्षीय व्यक्तीला दि ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान एका मोबाईल नंबरद्वारे व्हॉटसअपवर फोन करीत त्या व्यक्तीचा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करीत त्या व्हीडीओला युट्युबवर व्हायरल केला असून तो जर डिलीट करायचा असेल तर त्यासाठी फिर्यादीकडून वेळोवेळी ५ लाख ८१ हजार रुपये घेवून देखील अजून पैशाची मागणी करणाऱ्या दोन मोबाईल नंबर धारकांविरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि.लीलाधर कानडे हे करीत आहेत.