चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या सोबत एका ठिकाणी अत्याचार करीत फोटो सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन मुलीने शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, चोपडा तालुक्यातील एका १८ वर्षीय अल्पवयीन मुलीस २२ वर्षीय तरुणाने जानेवारी महिन्यात अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबध निर्माण करून तिच्यासोबत एका शेतात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या त्यानंतर दि ९ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील एका महाविद्यालयाच्या रोडवर अल्पवयीन मुलीने त्याच्या सोबत प्रेम संबध ठेवण्यास नकार दिल्याने संशयित आरोपी समीर सलीम पिंजारी (वय २२) याने मुलीसोबत असलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन मुलीने चोपडा शहर पोलीस स्थानक गाठत संबधित तरुणाविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक अजित सावळे हे करीत असून संशयित आरोपी समीर सलीम पिजारी यास अटक केली आहे.