चोपडा : प्रतिनिधी
एका अल्पवयीन मुलीवर एका २० वर्षीय तरुणाने वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक पोलिसांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी चोपडा येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना मे व जून महिन्यात एका शेतरस्त्याने घेवून जात एका शेतात तिच्यावर अत्याचार केला तर डिसेंबर महिन्यात चोपडा शहरातील एका महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम दरम्यान अल्पवयीन मुलीस एका वर्गात घेवून जात त्याठिकाणी सुद्धा संशयित आरोपी विलास सुभाष भिल (वय २०) याने अत्याचार करीत मुलीचे फोटो इन्स्टाग्रामवर प्रसारित करीत भावाला मारून टाकण्याची धमकी दिली, या प्रकरणी दि ९ रोजी अल्पवयीन मुलीने चोपडा शहर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढी तपास सहा.पोलीस निरीक्षक अजित सावळे हे करीत असून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.